Weather Update : राज्यात किमान तापमानात वाढ; उकाड्यातही झाली वाढ

Maharashtra Temperature:अक्वान चक्रीवादळ निवळल्यानंतर तयार झालेल्या ढगाळ वातावरणामुळे राज्यातून थंडी कमी झाली आहे. तर पहाटेच्या गारठा कमी झाला असून दुपारी उन्हाचा चटका आणि उकाड्यात वाढ झाली आहे. कोकणात कमाल तापमानाचा पारा ३५ अंशांजवळ पोहचला आहे. तर संपूर्ण राज्यात किमान तापमानात वाढ झाली आहे. आज राज्यात निरभ्र आकाशासह तापमानात चढ-उतार कायम राहण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
Loading content, please wait...