Rain Update : मराठवाड्यात हलक्या सरी शक्य; उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी

Maharashtra Weather:राज्यात गुलाबी थंडीची चाहूल लागली असून उत्तर महाराष्ट्रात थंडीच्या लाटेनं हुडहुडी वाढली आहे. मराठवाड्यात अंशत: ढगाळ हवामानामुळे तापमानात चढ-उतार सुरु आहेत. आज म्हणजेच शनिवारी मराठवाडा तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी हजेरी लावण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.आज म्हणजेच शनिवारी नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्यांत हलक्या सरी शक्य आहेत. तर उर्वरित भागात अंशत: ढगाळ हवामानाचा अंदाज आहे. काल दक्षिण ओडिशाच्या किनारी भागावर असलेले तीव्र कमी दाबाचे क्षेत्र जवळपास उत्तरेकडे सरकले आहे.
Loading content, please wait...