Video
Weather Update : चक्रीवादळामुळे ढगाळ हवामानाचा अंदाज; तापमानात चढ-उतार सुरु
Weather Forecast:राज्यात थंडीचा कडाका वाढू लागला आहे. बंगालच्या उपसागरावरील चक्रीवादळाच्या निर्मितीमुळे राज्यात ढगाळ हवामान झाले आहे. त्यामुळे तापमानात चढ-उतार सुरु आहेत. आज म्हणजेच बुधवारी राज्यात ढगाळ हवामानासह तापमानात चढ-उतार कायम राहण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. बंगालच्या उपसागरातील मध्य दक्षिण आणि लगतच्या पश्चिम-मध्य भागावर असलेल्या ‘अक्वान’ चक्रीवादळाची आज पहाटे ५.३० वाजता तीव्रता वाढली आहे.
