Video
Rain Update : राज्यात तापमानात चढ-उतार; थंडी कमीच
Temperature Rise:राज्यात तापमानात चढ-उतार सुरुच आहेत. दुपारी उन्हाच्या चटक्यामुळे उकाड्यात वाढ झाली आहे. तर काही भागात अंशत ढगाळ वातावरणामुळे थंडी कमी झाली आहे. त्यामुळे राज्यात कडाक्याच्या थंडीची प्रतीक्षा आहे. आज दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, दक्षिण मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरी हजेरी लावण्याचा अंदाज असून उर्वरित राज्यात तापमानात चढ-उतार सुरूच राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
