Video
Hawaman Andaj : राज्यातील काही भागात ढगाळ हवामानामुळे गारठा कमी
Weather Forecast:अक्वान चक्रीवादळामुळे उत्तरेकडील थंडी राज्याकडे ओढली जाऊन राज्यातही गारठा वाढला होता. वादळ विरल्यामुळे मात्र राज्यात पुन्हा थंडी कमी झाली आहे. राज्यातील काही भागात अंशतः ढगाळ हवामान आहे. याचा परिणाम थंडीवर झाला असून गारठा कमी झाला आहे. राज्यातील बहुतांशी भागात किमान तापमानात वाढ दिसून आली आहे. आज धाराशिव येथे राज्यातील निचांकी १२.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. जळगाव येथे १३.२ अंश सेल्सिअस, धुळे येथे १३.५ अंश सेल्सिअस तापमान होते. राज्यातील किमान तापमानात चढ उतार होत असल्याने अनेक ठिकाणी गारठा काहीसा कमी झाला आहे.
