Rain Update : विदर्भात किमान तापमानात घट; राज्यात काही भागात हलक्या सरी शक्य

Rain Forecast:राज्यात किमान आणि कमाल तापमानात वाढ झाल्याने थंडी कमी झाली आहे. तर काही भागात अंशत: ढगाळ वातावरणासह हलक्या सरी हजेरी लावत आहेत. तर दुपारी उन्हाचा चटका वाढत असून उकाडाही जाणवू लागला आहे. आज म्हणजेच शुक्रवारी दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज असून उर्वरित राज्यात तापमानातील वाढ काय राहण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
Loading content, please wait...