Video
Rain Update : पूर्व विदर्भात पावसाचा अंदाज; उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम
Rain Forecast:राज्यात उन्हाचा चटका कायम असून दुपारी उकाडा जाणवत आहे. तर काही भागात पहाटे गारवा अनुभवायला मिळत आहे. अनेक ठिकाणी उन्हाचा पारा पस्तीशी पार आहे. तर आज म्हणजेच मंगळवारी विदर्भात काही ठिकाणी गडगडाटासह पावसाचा अंदाज असून उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
