Rain Update : राज्यात ९ जिल्ह्यांत पावसाचा इशारा

Rain Alert:बंगालच्या उपसागरावरील 'अर्णब' चक्रीवादळामुळे अनेक भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. तर काही भागात उन्हाचा चटका कायम आहे. तसेच तापमानातही चढ-उतार सुरूच आहे. आज म्हणजेच ३० ऑक्टोबर रोजी राज्यातील ९ जिल्ह्यांत पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. तर उर्वरित राज्यात काही ठिकाणी उन्हाचा चटका कायम राहून हलक्या सरी हजेरी लावण्याची शक्यता आहे. परंतु या सरी सर्वदूर हजेरी लावण्याची शक्यता कमीच आहे.
Loading content, please wait...