Video
Monsoon Update: महाराष्ट्रात १९% पावसाची तूट; मराठवाड्यात सर्वाधिक परिणाम का?
Maharashtra Monsoon Update:यंदाच्या मॉन्सून हंगामात देशात सरासरीपेक्षा सुमारे १३ टक्के कमी पाऊस झाला, तर महाराष्ट्रात पावसाची तूट १९ टक्क्यांपर्यंत नोंदवण्यात आल्याचे या चर्चेत सांगण्यात आले आहे. मराठवाड्यात सुमारे ३९ टक्के, विदर्भात २७ टक्के आणि कोकणात १५ टक्के पावसाची तूट असल्याची माहिती देण्यात आली. मध्य महाराष्ट्रात मात्र ही तूट तुलनेने कमी आहे.यंदा मॉन्सूनचा अंदाज काय होता? एल निनो, आयओडी आणि एमजेओसारख्या जागतिक हवामान प्रणालींचा पावसावर कसा परिणाम झाला? एमजेओ ऑक्टोबरमध्ये सक्रिय झाल्याने दक्षिण भारतातील पावसावर काय परिणाम होऊ शकतो? तसेच, महाराष्ट्रात ऑक्टोबरमधील पावसाची स्थिती कशी राहू शकते? जाणून घ्या हवामान तज्ज्ञांसोबतच्या चर्चेतून
