Video
Livestock Insurance Scheme : पशुधन विमा योजनेला मंजुरी; गाय, म्हैस, शेळीसाठी किती भरपाई मिळणार?
Maharashtra Livestock Insurance Scheme 2026 : राज्य सरकारने केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत 'पशुधन विमा योजना' राबविण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता पूर, वीज पडणे, अपघात, विषबाधा किंवा इतर कोणत्याही कारणामुळे जनावरांचा अनैसर्गिक मृत्यू झाला, तर पशुपालकांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे.
