Video
Farmer Relief :राज्यातील कोणकोणते शेतकरी मदतीसाठी पात्र ठरणार ?
Farmer Relief News:दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पाच हजार रुपये देण्यात येतील. मात्र, ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले असेल, तरच ही मदत दिली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १५ दिवसांपूर्वी शेतकऱ्यांना पाच हजार रुपये देण्याची घोषणा केली होती. ही अग्रिम मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये डीबीटी प्रणालीद्वारे जमा करण्यात येणार आहे. यासाठी सात हजार ५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मंगळवारी (ता. २७) मंजुरी देण्यात आली.
