OTS Farmer Loan : कर्जमाफी योजनेतील एकवेळ समझोता योजनेच्या पहिल्या यादीत किती शेतकरी?

Farmer Loan Waiver:राज्यातील एक लाख ६९ हजार ८२० शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा मार्ग अखेर मोकळा झालाय. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील एकवेळ समझोता म्हणजेच ओटीएस गटात पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर झालीय. सरकारकडून दोन लाख रुपयांची मदत मिळण्यापूर्वी शेतकऱ्यांना स्वतःच्या खिशातून कर्जाची उर्वरित रक्कम भरावी लागणार आहे. त्यासाठी ३१ मार्च २०२७ पर्यंतची मुदत देण्यात आलीय. मग शेतकऱ्यांना नेमके किती पैसे भरावे लागतील? यादीत नाव कुठं पाहायचं? पैसे भरल्यानंतर कर्जमुक्तीची प्रक्रिया कशी होणार? आणि कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांचा पहिल्या यादीत समावेश आहे? पाहूया आजच्या ॲग्रोवन शोमधून.
Loading content, please wait...