Video
Farmer Loan Waiver : राज्य सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ कधी देणार?
Farmer Scheme:पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची चौथी यादी जाहीर झाली आहे. या यादीत तब्बल १ लाख १५ हजार ६९७ शेतकऱ्यांचा समावेश आहे. पण एकीकडे बँकांनी ३१ लाख १७ हजार थकीत कर्जखात्यांची माहिती पोर्टलवर अपलोड केली असताना, आतापर्यंत केवळ १५ लाख ८५ हजार शेतकऱ्यांनाच कर्जमुक्तीचा लाभ मिळाल्याची माहिती सरकारने दिली आहे. मग उर्वरित शेतकऱ्यांचं काय? चौथ्या यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांनी कोणती प्रक्रिया पूर्ण करायची? आणि कर्जमाफीची रक्कम खात्यावर जमा होण्यासाठी आणखी किती प्रतीक्षा करावी लागणार? जाणून घेऊया आजच्या ॲग्रोवन शोमध्ये.
