Video
Dushkal Madat: दुष्काळाच्या मदतीपासून वंचित शेतकऱ्यांचा आकडा किती?
Farmer Relief:दुष्काळी मदतीसाठी राज्य सरकारने दीड कोटी शेतकऱ्यांची घोषणा केली... पण प्रत्यक्षात मदत मिळाली किती शेतकऱ्यांना? सरकारच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हजार रुपये जमा झाले आहेत, तर १० लाख शेतकऱ्यांची मदत विविध कारणांमुळे रखडली आहे. मग उर्वरित ४० लाख शेतकरी नेमके कुठे गेले? दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची संख्या दीड कोटी की एक कोटी दहा लाख? दुसरीकडे, एनडीआरएफच्या वाढीव दरानुसार मिळणारी मदत एकाच वेळी मिळणार की टप्प्याटप्प्याने? आणि आणखी १० तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश होणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया आजच्या ‘द ॲग्रोवन शो’मधून.
