Video
Drought Relief: एलनिनोचा अंदाज, दुष्काळ नियोजन आणि १५ ते १६ हजार कोटींची मदत?
El Nino:जून महिन्यात पावसाने ओढ दिल्यानंतर जुलैमध्ये चांगला पाऊस झाला. त्यामुळे एलनिनोचा अंदाज खोटा ठरणार का, असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पावसाने पुन्हा दडी मारली. या परिस्थितीत सरकार दुष्काळाच्या नियोजनाबाबत गाफील राहिले होते का? या प्रश्नावर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्टीकरण दिले.जनावरांचा चारा, पिण्याचे पाणी आणि शेतकऱ्यांना पर्यायी उत्पन्न मिळावे यासाठी सरकारने नियोजन केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच दुष्काळ मदतीसाठी केंद्र सरकारकडे साधारण १५ ते १६ हजार कोटी रुपयांची मागणी केल्याची माहितीही त्यांनी दिली. मात्र, केंद्राकडून शेतीच्या नुकसानीबरोबरच पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्यासाठीही जास्तीत जास्त मदत मिळवण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
