Video
Drought Madat: ५ हजारांची अग्रीम मदत कधी मिळणार? पंचनामे, फार्मर आयडी, ई-केवायसीबाबत अपडेट
Drought Aid:दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजार रुपयांची अग्रीम मदत देण्याच्या घोषणेनंतर आता प्रत्यक्ष वितरण कधी सुरू होणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे, केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणाऱ्या दुष्काळी मदतीच्या प्रस्तावाची रक्कम १८ हजार कोटी रुपयांवरून जवळपास ३५ हजार कोटी रुपयांपर्यंत वाढल्याची माहिती समोर आली आहे.मात्र, विभागनिहाय पंचनाम्यांच्या कामात मोठी तफावत दिसत आहे. अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर विभागांत ९९ टक्के, लातूर विभागात ९७ टक्के, पुणे विभागात ९२ टक्के आणि नाशिक विभागात ९० टक्के काम पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले आहे. नागपूर विभागात ७८ टक्के, कोल्हापूर विभागात ५३ टक्के, तर कोकण विभागात १२ टक्के पंचनामे पूर्ण झाल्याची माहिती आहे.
