Video
Drought 2026 : ३२७ जाणकार आणि तज्ज्ञांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस का लिहिलं?
Maharashtra Drought:महाराष्ट्रातील ३०४ तालुक्यांत सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे. पण दुष्काळ जाहीर झाला म्हणजे शेतकऱ्यांच्या अडचणी संपल्या का? ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पावसाने मोठी ओढ दिली. खरीप पिकांचं नुकसान झालं. शेतकऱ्यांच्या हातात उत्पन्न नाही, शेतमजुरांच्या हाताला काम नाही, जनावरांसाठी चारा आणि पिण्यासाठी पाणी मिळण्याची चिंता आहे. त्यात आता रब्बी हंगामही धोक्यात आला आहे. अशा परिस्थितीत सरकारने जाहीर केलेली मदत पुरेशी आहे का? दुष्काळाचा सामना करण्यासाठी रोजगार, पीक नुकसानभरपाई, पशुधनासाठी चारा, पिण्याचं पाणी आणि कर्जमाफी अशा उपाययोजना तातडीने राबवण्याची गरज आहे का? या प्रश्नांकडे आता राज्यातील अर्थशास्त्रज्ञ आणि समाजशास्त्रज्ञांच्या एका समूहाने सरकारचं लक्ष वेधलं आहे.
