Maharashtra Drought : १९७२ पेक्षाही यंदाचा दुष्काळ भयंकर?

Drought Situation:१९७२ चा भीषण दुष्काळ पाहिलेल्या ७० ते ८० वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांच्या मते, यंदाची परिस्थिती त्याहीपेक्षा गंभीर आहे. लातूर जिल्ह्यातील निटूर गावात पिण्याच्या पाण्यापासून जनावरांच्या चारा-पाण्यापर्यंत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. शेतीत उत्पन्न नाही, लेकरांच्या हाताला काम नाही आणि पशुधन जगवायचं कसं, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे.१९७२ च्या दुष्काळात धरणं आणि विहिरींमध्ये पाणी होतं; मात्र यंदा पाण्याचे स्रोतही आटत चालले आहेत. येत्या फेब्रुवारी-मार्चमध्ये परिस्थिती आणखी बिकट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. निटूरमधील ज्येष्ठांनी सांगितलेला दुष्काळाचा अनुभव आणि सध्याच्या परिस्थितीचं वास्तव या व्हिडिओतून जाणून घ्या.
Loading content, please wait...