Video
Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर करण्याचे नियम आणि अटी काय आहेत ?
राज्यात पावसात मोठी तूट आहे तसेच अनेक गावांमध्ये मोठा खंडही पडला आहे. पीके वाळत आहेत. त्यामुळे शेतकरी दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करत आहेत. दुष्काळ खरिप आणि रब्बी दोन्ही हंगामात जाहीर करता येतो. पण त्यासाठी दोन ट्रीगर ठरलेले आहेत. दोन्ही ट्रीगर लागू झाल्यानंतर दुष्काळ जाहीर होतो.
