Video
MahaDBT Scheme: महाडीबीटीतील ३३ लाख शेतकऱ्यांना एक आठवड्यात कागदपत्र सादर करण्याच्या सूचना
Mahadbt verification notice: शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असलेल्या अनुदानाच्या संधींचा लाभ घेण्याची वेळ आता जवळ आली आहे. कृषी विभागाने राज्यातील सुमारे ३३ लाख शेतकऱ्यांना आठवड्याच्या आत आवश्यक कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन केले आहे. ही मुदत केवळ सात दिवसांची असून, या कालावधीत कागदपत्रे सादर न केल्यास संबंधित अर्ज ९ जानेवारीनंतर संगणकीय प्रणालीद्वारे आपोआप रद्द (ऑटो डिलिट) करण्यात येणार आहेत.
