Madgyal Sheep: राष्ट्रीय मान्यता मिळालेल्या माडग्याळ मेंढीची खासियत काय?

महाराष्ट्रातल्या माळरानावर वाढलेल्या, उष्णता असो किंवा प्रतिकूल हवामान, त्यातही तग धरून राहणाऱ्या आणि मांस उत्पादनासाठी विशेष ओळखल्या जाणाऱ्या एका मेंढीची आता देश पातळीवर अधिकृतपणे नोंद झालीये.. बरोबर आपण बोलतोय माडग्याळ मेंढीबद्दल.. ७ ऑगस्ट २०२६ रोजी राष्ट्रीय पशू अनुवांशिक संसाधन ब्युरो, कर्नाल इथं झालेल्या जात नोंदणी समितीच्या १४ व्या बैठकीत ही नोंद झाली. यामध्ये एकूण १६ नवीन देशी पशुधन आणि कुत्र्यांच्या जातींच्या नोंदणीला मान्यता देण्यात आली. त्यातील माडग्याळ मेंढी ही महाराष्ट्रातील स्वतंत्र देशी मेंढीची जात म्हणून मान्यता देण्यात आली. पण या नोंदीचं महत्त्व काय आहे? माडग्याळ मेंढीची वैशिष्ट्यं नेमकी काय आहेत? या जातीचं जतन आणि पैदास कुठे केली जाते? आणि मुळात याचा मेंढपाळांना फायदा काय हेच जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमधून...
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com