Video
Lucern Cultivation: लसूणघासाची लागवड कशी करावी; वाण कोणते वापरावे?
Fodder Farming:दुष्काळामुळं जनावरांच्या चाऱ्याचं व्यवस्थापन करा असं तुम्ही खूप वेळेस ऐकलं असेल.. पण कोणतं चारा पीक लावायचं.. यासाठी बहुतेकजण ज्वारी, मका या पिकांना प्राधान्य देतात.. त्यात दुष्काळाच्या परिस्थितीनुसार आणि रब्बी हंगामात येणारं बहुकापणी असणारं लसूण घास म्हणजे लुसर्न आपल्याला यंदा फायद्याचं राहू शकतं.. कारण यामध्ये जवळपास १८ ते २२ टक्क्यांपर्यंत प्रथिनं असतात.. यासोबत जीवनसत्व अ आणि ड मिळतात. याशिवाय महत्त्वाचं म्हणजे ऑक्टोबरमध्ये याची लागवड केली तरी मार्चपर्यंत लसूणघासचं उत्पादन मिळत राहतं.. पण कशी करायची ही लागवड, लसूण घासचं कोणतं वाण चांगलं आहे, त्याला खत द्यायचं का, त्याची कापणी किती दिवसांनी करता येते.. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याचं एकूण उत्पादन किती मिळतं.. हे सगळं जाणून घेऊयात आजच्या या व्हिडीओमधून.. त्यामुळं व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघा..
