Video
Online Game Bill: लोकसभेत ऑनलाईन जुगारावर बंदी घालणारं विधेयक मंजूर
Lok Sabha online gambling ban bill: देशभरात वाढत्या ऑनलाईन मनी गेमिंगच्या व्यसनावर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ऑनलाईन मनी गेमिंग प्रचार व नियमन विधेयक २०२५ लोकसभेत बुधवारी (ता. २०) मंजूर करण्यात आले. या विधेयकानुसार आता ऑनलाईन मनी गेम ऑफर करणे, त्याची जाहिरात करणे, ते चालवणे किंवा त्यासाठी सुविधा उपलब्ध करून देणे यावर पूर्णतः बंदी घालण्यात येणार आहे.