Loan Waiver : कर्जमाफीच्या दुसऱ्या यादीत किती शेतकऱ्यांची नावं आहेत?

राज्यातील कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या लाखो शेतकऱ्यांसाठी एकाच वेळी दोन मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडी समोर आल्या आहेत. एकीकडे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची दुसरी यादी प्रसिद्ध झाली आहे आणि तब्बल ३ लाख ५५ हजार ६१४ शेतकऱ्यांचा या यादीत समावेश झाला आहे. तर दुसरीकडे, आदिवासी जिल्ह्यांतील आणि वैयक्तिक वनहक्क असलेल्या पात्र शेतकऱ्यांसोबतच मयत आणि वयोवृद्ध शेतकऱ्यांच्या पात्र वारसांनाही कर्जमाफीचा लाभ देण्याचा मार्ग सरकारने मोकळा केला आहे. पण यामध्ये एक मोठी अडचण अजूनही कायम आहे. बँकांच्या कर्जखात्यांमधील त्रुटींमुळे सुमारे १० लाख खाती अजूनही दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. मग या दोन्ही निर्णयांचा शेतकऱ्यांना नेमका काय फायदा होणार आहे, दुसऱ्या यादीत कोणत्या विभागातील किती शेतकरी आहेत आणि वारसांना कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी काय करावं लागणार आहे, हेच आजच्या अग्रोवन शोमध्ये पाहूया.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com