Video
Loan Waiver : दुसऱ्या टप्प्यात किती शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ?
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात सरकारने ५ हजार ८६ कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते मंगळवारी ६ लाख ३६ हजार ३६ पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर ही रक्कम जमा करण्यात आली. पण पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात मिळून किती शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली? अजून किती शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत? आणि पुढची यादी कधी जाहीर होणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? पाहुयात आजच्या द ॲग्रोवन शोमधून...
