Video
Loan Waiver: कर्जमाफी योजनेचा आता कोणत्या शेतकऱ्यांना निधी मिळणार?
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या कर्जमाफीची प्रक्रिया सध्या टप्प्याटप्प्याने सुरू आहे. पहिल्या यादीतील आणखी ६ लाख २० हजार शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर सोमवारपर्यंत कर्जमाफीची रक्कम जमा केली जाणार असल्याची माहिती सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली आहे. पण कर्जमाफीची प्रक्रिया सुरू असतानाच ॲग्रीस्टॅक नोंदणी, नवीन पीककर्ज आणि प्रोत्साहन अनुदानाचे प्रश्नही कायम आहेत. त्यामुळे आजच्या ॲग्रोवन शोमध्ये कर्जमाफीची सध्याची नेमकी स्थिती काय आहे, कोणाला कधी लाभ मिळणार आणि पुढची प्रक्रिया काय असणार, हे समजून घेऊया.
