Video
Loan Waiver : आत्तापर्यंत कोणत्या विभागात कर्जमाफीची किती रक्कम वितरीत करण्यात आली?
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर पुढील दोन महिन्यात सर्व रक्कम जमा करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. पहिल्या टप्प्यात ५ हजार २९ कोटी रुपयांचा ६ लाख २२ हजार शेतकऱ्यांना लाभ देण्यात आलाय. पण अजूनही सर्व शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी लागणार असेल तर शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावीच लागणर का? या विलंबाचा फटका शेतकऱ्यांना कसा बसू शकतो? एकीकडे मोठ्या प्रमाणात ई-केवायसी झाल्याचे दावे केले जात असताना या टप्प्या-टप्प्याचं गणित का मांडलं जात आहे? आणि आत्तापर्यंत कोणत्या विभागात किती कोटी निधी वितरीत करण्यात आला आहे? जाणून घेऊया आजच्या द अॅग्रोवन शोमधून....
