Video
KVK Staff Update: कृषी विज्ञान केंद्राच्या कर्मचाऱ्यांना पगार-भत्ते आणि प्रमोशनचा मोठा निर्णय
दिल्लीतील ३६व्या वार्षिक कुलगुरू संमेलनात KVK म्हणजेच कृषी विज्ञान केंद्राच्या कर्मचाऱ्यांसंदर्भात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. KVK स्टाफला विद्यापीठ आणि ICAR व्यवस्थेचा अविभाज्य भाग मानण्यासोबतच पगार, HRA, TA-DA आणि आरोग्य सुविधांचा लाभ देण्याचा निर्णय झाल्याचे सांगण्यात आले. तसेच KVK इन्चार्जला किमान एक, तर SMS कर्मचाऱ्यांना किमान दोन प्रमोशन देण्याची तरतूद करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे KVK कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
