Krushi Samruddhi Yojana: कृषी समृद्धी योजनेचे ५ हजार कोटी कधी मिळणार? मंत्रिमंडळात प्रस्ताव मांडणार

Krushi Samruddhi Scheme:एक रुपयात पीकविमा योजना बंद केल्यानंतर त्यातून होणारी बचत कृषी समृद्धी योजनेत वळवण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. या योजनेतून पाच वर्षांत २५ हजार कोटी रुपयांची भांडवली गुंतवणूक करून शेती क्षेत्रात पायाभूत सुविधा उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र, योजनेच्या अंमलबजावणीचा वेग आणि निधीचा प्रश्न उपस्थित होत आहे. सध्या २ हजार कोटी रुपयांची तरतूद असून, आणखी ३ हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर मांडणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. यासोबतच दुष्काळी परिस्थितीतील पीक नुकसान पंचनामे आणि कृषी विभागाच्या जबाबदारीबाबतही चर्चा करण्यात आली. कृषी समृद्धी योजनेचे पुढे काय होणार? जाणून घ्या.
Loading content, please wait...