Video
Rain Update : राज्यात उन्हाचा चटका कायम; काही ठिकाणी पावसाची शक्यता
IMD Update:राज्यात उन्हाचा चटका तापदायक ठरत असून उकाडाही जाणवू लागला आहे. बहुतांश ठिकाणी उन्हाचा पारा पस्तीशीच्या पार आहे. आज कोकणात उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा देण्यात आला असून पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
