Video
Weather Update : कोकणात उन्हाचा चटका; उकाड्यात वाढ
Maharashtra weather update: राज्यात किमान तापमानात वाढ झाल्याने थंडी जवळपास नाहीशी झाली आहे. कमाल तापमानाचा पारा तिशीच्या पुढे गेल्यामुळे उकाड्यात लक्षणीय वाढ झाली आहे. आज राज्यात कोरडे हवामान राहून उन्हाचा चटका जाणवण्याची शक्यता आहे. तसेच पुढील काळात किमान तापमानात आणखी वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
