Video
Monsoon Rain: कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता
Maharashtra weather update: राज्यातील अनेक भागांत गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडत असून, इतर ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम सरी कोसळत आहेत. हवामान विभागाने आज आणि उद्या राज्यभर पावसाचा जोर कायम राहील, असा अंदाज वर्तवला आहे.