Video
Drought Madat : दुष्काळाच्या मदतीवरून कर्नाटकचे केंद्र सरकारवर आरोप
Karnataka Drought Relief:महाराष्ट्र सरकारनं दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्राकडे तब्बल ३१ हजार कोटी रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव पाठवलाय. पण अद्याप या मदतीची प्रतीक्षा आहे. अशातच शेजारच्या कर्नाटकातून एक महत्त्वाची बातमी समोर आलीय. कर्नाटक सरकारनंही केंद्राकडे दुष्काळ निवारणासाठी २२ हजार ४०० कोटी रुपयांची मदत मागितलीय. त्यासाठी एकदा नाही, दोनदा नाही, तर तीन वेळा निवेदनं दिलीत. पण केंद्र सरकारकडून प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी केलाय. विशेष म्हणजे, यापूर्वी कर्नाटकला दुष्काळी मदतीसाठी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली होती. त्यामुळे आता महाराष्ट्राच्या मदतीचं काय होणार? केंद्र सरकारकडून मदत मिळण्यास विलंब का होतोय? आणि कर्नाटक सरकारनं नेमका कोणता आरोप केलाय? पाहूया आजच्या ॲग्रोवन शोमधून.
