Video
Karjmafi GR 2026 : कर्जमाफीसाठी ७ हजार कोटी रुपयांच्या निधी वितरणाला राज्य सरकारची मंजूर
३१ जुलैपूर्वीच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा होईल, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी सोलापूरमध्ये दिली होती. त्यामुळे लाखो शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत होते. मात्र ३१ जुलै उलटला, १ ऑगस्ट गेला, २ ऑगस्ट गेला आणि आज ३ ऑगस्टही संपत आला, तरी अनेक पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा झालेली नाही. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे. कर्जमाफीची रक्कम नेमकी कधी जमा होणार? याच दरम्यान आणखी एक महत्त्वाची घडामोड झाली आहे. राज्य सरकारने कर्जमाफीसाठी ७ हजार कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. तर उद्या कर्जमाफीची पहिल्या टप्प्यातील रक्कम जमा होण्याची शक्यता माध्यमांमध्ये सूत्रांच्या हवाल्याने वर्तवली जात आहे. मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या निधीच्या वितरणाची सुरुवात होण्याची शक्यता आहे. मात्र हा व्हिडीओ रेकॉर्ड करेपर्यंत राज्य सरकारने याबाबत अधिकृत कार्यक्रम किंवा घोषणा केलेली नव्हती. मग हा ७ हजार कोटींचा निधी कोणासाठी आहे? पहिल्या टप्प्यात किती शेतकऱ्यांना लाभ मिळू शकतो? ई-केवायसी किती शेतकऱ्यांनी पूर्ण केली आहे? आणि उर्वरित शेतकऱ्यांचं काय? हेच जाणून घेऊया आजच्या द ॲग्रोवन शो मधून.
