Video
Monsoon Alert: माॅन्सूनच्या पुढील वाटचालीसाठी पोषक हवामान आहे का?
IMD Monsoon Update: मान्सूनने आज देशाच्या उत्तरेकडील काही भागांमध्ये पुढील प्रगती केली असली, तरी महाराष्ट्रातील त्याची वाटचाल गेल्या पाच दिवसांपासून स्थिरावलेली आहे. दरम्यान, राज्यातील हवामानात विविधता कायम असून काही भागांमध्ये वादळी पावसाची, तर काही ठिकाणी उष्णता आणि दमट वातावरणाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
