Video
Wheat Export:भारताची गव्हाची निर्यात पुन्हा सुरू; शेतकऱ्यांना फायदा?
चार वर्षांच्या खंडानंतर भारतातून गव्हाची निर्यात पुन्हा सुरू झाली आहे. देशातील विक्रमी उत्पादन, सरकारी साठ्यात वाढ आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढते दर यामुळे निर्यातीसाठी अनुकूल परिस्थिती तयार झाली आहे. केंद्र सरकारने तब्बल 50 लाख टन गहू निर्यातीस मंजुरी दिली असून ITC Limited कंपनीकडून कांडला बंदरातून United Arab Emirates साठी 22 हजार टन गहू पाठवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
