Video
USA Tariffs: भारताच्या कापडावर अमेरिकेत आता एकूण ५१ % दरम्यान शुल्क लागणार
भारतात वर्षाला उत्पादीत होणाऱ्या एकूण कापडापैकी २२ टक्के कापड निर्यात होते. तर भारताच्या एकूण निर्यातीपैकी तब्बल ३५ टक्के कापड निर्यात अमेरिकेला होत असते. भारताच्या कापूस आधारित उत्पादनाच्या निर्यातीपैकी १७ टक्के निर्यात आणि ३५ टक्के कापड निर्यात अमेरिकेला होते. अमेरिकेचे मार्केट भारतासाठी महत्वाचे आहे. पण आता भारतापेक्षा अमेरिकेच्या बाजारात चीन, व्हिएतनाम आणि बांगलादेशचे कापड स्वस्त होणार आहे. अमेरिकेला कापड निर्यात कमी होणार असल्याने भारतातील कापड हबमध्ये चिंतेचे वातावरण आहे.