Video
Indian History : पुण्याच्या रांजे गावात २५० वर्षांपूर्वीची पाण्याचा पुनर्वापर करणारी ऐतिहासिक व्यवस्था
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील ऐतिहासिक रांजे गावात अडीचशे ते तीनशे वर्षांपूर्वीची पाण्याचा पुनर्वापर करणारी अनोखी व्यवस्था पाहायला मिळते. रांजेश्वर मंदिर परिसरात असलेल्या तीन कुंडांपैकी पहिल्या कुंडातील पाणी पिण्यासाठी व देवासाठी, दुसऱ्या कुंडातील पाणी आंघोळीसाठी, तर तिसऱ्या कुंडातील पाणी कपडे धुण्यासाठी वापरले जायचे. यानंतर उरलेले पाणी एका खास नहरीद्वारे खालील शेतीसाठी पाठवले जायचे. या ऐतिहासिक परंपरागत शहाणपणाचा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा मिलाफ साधून भविष्यात उत्तम जलव्यवस्थापन निर्माण करण्याची प्रेरणा यातून मिळते.
