India US Deal : अमेरिकेसोबतच्या करारात भारत शेतीसह विविध मुद्यांवर ठाम राहणार का?

भारत आणि अमेरिका यांच्यातील प्रस्तावित व्यापार करारावरून पुन्हा एकदा विविध चर्चांनी जोर धरला आहे. रॉयट्र्सच्या एका अहवालानुसार शेतीसह विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर दोन्ही देशांमध्ये एकमत होत नसल्याने या व्यापारी करारावर स्वाक्षरी होण्यासाठी वेळ लागू शकतो, असा सांगितलं आहे. तर दुसरं म्हणजे केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी एक्सवर ट्वीट करत या अहवालाला खोटा, निराधार आणि दिशाभूल करणारा असून दोन्ही बाजूने करारातील वाटाघाटी पूर्ण करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु असल्याचं सांगितलं. तिसरीकडे शेतकरी संघटनांनी या कराराला कडाडून विरोध करत हा करार शेतकऱ्यांची मेहनत नासवेल. त्यामुळे या करारवर भारताने सही करून नये अशी मागणी केली आहे. पण आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यामुळे नेमकं काय सुरु आहे? कारण प्रत्येकाची एक बाजू आहे. रॉयटर्सचा अहवाल काय सांगतो, मंत्री गोयल काय दावा करतायत, शेतकरी नेत्यांचं काय म्हणणं आहे? सगळं जाणून घेऊया आजच्या द अॅग्रोवन शोमधून....
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com