Video
Penaut Export India: भारतातून इंडोनेशियाला बेकायदेशीर शेंगदाणा निर्यात का होत आहे?
२०२५ एप्रिलच्या मध्यात भारतातून आयात होणाऱ्या शेतीमालामधील ॲफ्लाटाॅक्सीनची पातळी तपासण्यासाठी इंडोनेशियन क्वारंटाइन ऑथॉरिटीने १७ अन्न तपासणी प्रयोगशाळांची स्थापना केली होती.तसेच तपाणीत ॲफ्लाटाॅक्सीनची पातळी जास्त आढळली तर तो माल नाकारला जाईल, असेही इंडोनेशियाने कळवल्याचे अपेडाने सांगितलं होतं. परंतु त्यानंतरही इंडोनेशियाकडून तक्रार सुरूच होती. अखेर इंडोनेशियाने ऑगस्ट २०२५ च्या शेवटच्या आठवड्यात भारतीय शेंगदाणा आयातीवर बंदी घातली.
