Humani Control: हुमणीच्या नियंत्रणासाठी जैविक बुरशीनाशक फायद्याचे?

हुमणी म्हणजे डोकेदुखी.. कारण मुळातच ती खादाड कीड.. ती असतेही जमिनीत आणि इतर किडींसारखी ती १५,२० दिवस नाही तर तब्बल ६ ते ८ महिने अळी अवस्थेत असते.. म्हणजे प्रत्येक किडीच्या जीवनचक्रामध्ये साधारण ४ अवस्था असतात.. जसं अंडी, अळी, कोष आणि पतंग.. त्यातली अळी अवस्था ६ ते ८ महिने असते.. आणि या अवस्थेत ती पिकाच्या मुळांवर तिची उपजीविका करते.. आणि पिकाचं नुकसान करते.. विशेष म्हणजे हुमणीचे फक्त भुंगेरेच जमिनीच्या बाहेर असतात.. बाकी सर्व अवस्था जमिनीत असतात.. त्यामुळं तिचं नियंत्रण करणं, प्रादुर्भावावर लक्ष ठेवणं थोडं कठिण जातं.. आणि फक्त ऊस नाही तर सोयाबीन, भूईमूग, मका, भात, ज्वारी अशा सगळ्याच पिकांवर ती हल्ला करत असते. त्यामुळं तिचं नियंत्रण करणं आपल्याला अत्यंत गरजेचं आहे.. कसं करायचं हे नियंत्रण.. आणि त्यासाठी कोणकोणते उपाय आहेत.. जाणून घेऊयात आजच्या या व्हिडीओमध्ये..
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com