Video
Ativrushti E-KYC : राज्यातील किती शेतकरी ई-केवायसीमुळे अनुदानापासून वंचित?
अतिवृष्टिग्रस्तांसाठी जाहीर केलेल्या पॅकेज वितरणात ई-केवायसीची अडचण येत असून साडेसहा लाख शेतकऱ्यांची ई-केवायसी न झाल्याने मदत वितरणात अडचणी आल्या आहेत. त्यामुळे पुढील तीन दिवसात शेतकऱ्यांच्या ई-केवायसी पूर्ण करून घ्याव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मग रखडलेली मदत शेतकऱ्यांना कधी मिळणार? मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले? जाणून घेऊया या व्हिडीओमधून...
