Video
Monsoon Rain Update : राज्यात कोणत्या भागांत मुसळधार पावसाचा इशारा?
IMD Monsoon Update: नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सूनने राज्यभर वेगाने प्रगती करत बुधवारी (ता. २४) संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे. मंगळवारी उत्तर मध्य महाराष्ट्र आणि उत्तर विदर्भातील काही भाग वगळता राज्याच्या बहुतांश भागात मान्सून दाखल झाला होता. त्यानंतर आज मान्सूनने उत्तर मध्य महाराष्ट्र आणि उत्तर विदर्भातील उर्वरित भागही व्यापल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.
