Video
Grape Care in Drought: पाण्याची कमतरता असल्यावर द्राक्ष बागेचे उत्पादन क्षमता किती ठेवावी?
Grape Farming:द्राक्ष हे अत्यंत संवेदनशील पीक.. सध्याची परिस्थिती बघता जमिनीतला ओलावा कमी होतोय तर वाढत्या तापमानामुळं बाष्पीभवनही वाढतंय.. त्यात पाण्याचीही कमतरता आहेच.. त्यामुळं द्राक्षाच्या वेलीला ताण बसतोय, पानं सुकतात, घड कमी येतात, मण्यांचा आकार लहान राहतो, त्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होतो.. हा परिणाम थेट शेतकऱ्यांच्या उत्पादनावर बसतोय.. त्यामुळं आपल्याला सध्या द्राक्षाचं नेहमीप्रमाणे नियोजन करुन चालणार नाहीये.. कमी पाण्यात काटेकोर नियोजनच आपलं द्राक्षाचं पीक वाचवू शकतं.. पण हे काटेकोर नियोजन म्हणजे काय.. ते नेमकी कसं करायचं.. हे सगळं जाणून घेऊयात आजच्या या व्हिडीओमधून..
