Video
Goat & Sheep in Drought: दुष्काळात शेळी-मेंढीपालनासाठी कोणत्या जाती निवडाव्यात?
Sheep Farming:शेळी-मेंढीपालन शेतकऱ्यांसाठी दुष्काळात आधार असतो. कमी पाणी, जास्त ऊन अशा दुष्काळजन्य भागात शेळ्या मेंढ्यांचं पालन हे जोखमीचं काम. चारा पाण्याची टंचाई, उष्णतेचा ताण यामुळं शेळ्या मेंढ्यांच्या आरोग्यावर, वजनावर, वाढीवर आणि प्रजननावर परिणाम होतो. पण आपण अशा जातींची निवड करु शकतो ज्या दुष्काळाच्या परिस्थितीत तग धरु शकतात.. त्यांची वाढ, वजन आणि प्रजनन यांच्यावर दुष्काळाचा कमीत कमी परिणाम होईल.. कोणत्या आहेत या जाती.. जाणून घेऊयात आजच्या या व्हिडीओमधून..
