Video
Fruit Orchard in Drought: दुष्काळी परिस्थितीत फळबाग व्यवस्थापनासाठी कमी खर्चातील उपाय
Fruit Orchard:फळपिकाच्या वाढीसाठी मुळातच तीव्र हवामान हे चांगलं नसतं.. तीव्र हवामान म्हणजे काय.. तर एकदम जास्त थंडी, जास्त तापमान, अतिवृष्टी किंवा दुष्काळ.. सध्या ऑक्टोबरमध्ये भरपूर तापमान वाढलेलं आहे.. जास्त तापमानात झाडं कोमजतात, फुलं आणि फळं गळून पडतात, अन्ननिर्मितीची प्रक्रिया मंद होते.. आणि पाण्याची कमतरता पडू लागली की जमिनीतला ओलावा संपतो, त्यामुळं पिकं सुकतात आणि उत्पादनात मोठी घट होते.. त्यामुळं आपल्याला वेळीच आपल्या फळबागेची काळजी घ्यायला सुरुवात करायचीये.. त्यासाठी फार उशीर करायचा नाहीये.. पण कशी घ्यायची ही काळजी. यामध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात... हेच जाणून घेऊयात आजच्या या व्हिडीओमधून..
