Video
Fertilizer Sales : खतांच्या काळाबाजाराला लगाम घातल्याचा केंद्र सरकारचा दावा
Fertilizer Black Marketing:शेतकऱ्यांच्या नावावर खत उचलायचं आणि तेच खत औद्योगिक कंपन्यांना काळ्या बाजारात विकायचं! खतांच्या या काळ्या धंद्याला आता ऑनलाइन बुकिंग प्रणालीमुळे चाप बसू लागला आहे. केंद्र सरकारने लागू केलेल्या एफएफएस म्हणजेच फर्टिलायझर सेल्स सिस्टिममुळे काही राज्यांमध्ये खत विक्रीत तब्बल ३० टक्क्यांपर्यंत घट झाल्याचं समोर आलं आहे. कारण आता शेतकऱ्याच्या मान्यतेशिवाय त्याच्या नावावर खत विकल्याचं दाखवता येत नाही. देशातील ३१० जिल्ह्यांमध्ये ही प्रणाली लागू झाली असून, महाराष्ट्रातही तिची अंमलबजावणी सुरू आहे. पण या प्रणालीमुळे खतांच्या काळाबाजाराला नेमका कसा आळा बसतोय? शेतकऱ्यांना खत खरेदी करताना कोणत्या अटींचं पालन करावं लागणार आहे? आणि पुढील काळात खत विक्रीवर आणखी कोणती बंधनं येऊ शकतात? जाणून घेऊया आजच्या ॲग्रोवन शोमध्ये.
