Video
Farmers Income : १७ हजार एफपीओ कंपन्या; शेतकऱ्यांचे उत्पन्न खरंच वाढले का?
शेतकऱ्यांची Bargaining Power म्हणजेच सौदाशक्ती वाढवण्यासाठी एफपीओ अर्थात Farmer Producer Company हे महत्त्वाचं माध्यम ठरू शकतं. पण महाराष्ट्रात मोठ्या संख्येने एफपीओ स्थापन झाल्या असल्या तरी त्यापैकी किती कंपन्या प्रत्यक्ष सक्षमपणे कार्यरत आहेत? आणि एफपीओच्या उलाढालीचा फायदा थेट शेतकऱ्यांच्या उत्पन्नात किती होतोय? या Agrowon Expert Opinion मध्ये भुदरगड नॅशनल फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बाळासाहेब सोळंकुरे यांच्याशी एफपीओची स्थापना, संचालकांची निवड, सदस्यसंख्या, Corporate Management, Compliance, Marketing आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीबाबत सविस्तर चर्चा केली आहे. एफपीओ केवळ स्थापन करून चालत नाही, तर योग्य नियोजन, शेती क्षेत्रातील तज्ज्ञ, मार्केटिंग आणि अकाउंटिंगची जाण असलेले संचालक आणि सक्रिय सभासद यांची गरज असते. मग एफपीओ यशस्वी करण्यासाठी नेमकं काय करावं? जाणून घेऊया या विशेष मुलाखतीतून.
