Farmer Loan Waiver : मृत शेतकऱ्यांच्या वारसांनाही मिळणार कर्जमाफी; प्रक्रिया काय?

कर्जमाफीच्या यादीत नाव आलं, पण संबंधित शेतकरी हयात नसल्यामुळे आता कर्जमाफीचा लाभ मिळणार की नाही, असा प्रश्न अनेक कुटुंबांसमोर निर्माण झाला होता. कारण कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी आधार प्रमाणीकरणाची अट होती. पण मृत शेतकऱ्यांच्या बाबतीत आधार प्रमाणीकरण कसं करायचं, हा मोठा पेच होता. आता सहकार आयुक्तालयाने या प्रकरणात स्पष्ट सूचना दिल्या आहेत. मृत शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर वारसांची नोंद करून, पात्र वारसांना कर्जमाफीचा लाभ देण्याची प्रक्रिया निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे मृत कर्जदार शेतकऱ्यांच्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे. पण ही प्रक्रिया नेमकी काय आहे? वारसांची नोंद कशी होणार? एकापेक्षा जास्त वारस असतील तर कर्जमाफीची रक्कम कशी मिळणार? आणि आधार प्रमाणीकरण होत नसेल तर वयोवृद्ध शेतकऱ्यांनी काय करायचं? जाणून घेऊया आजच्या द ॲग्रोवन शोमधून.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com