Farmer Loan Waiver : नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची दोन लाख अनुदानाची मागणी?

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफीवरून सध्या शेतकऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. एकीकडे ज्या शेतकऱ्यांची नावं लाभार्थी यादीत आहेत, त्या शेतकऱ्यांसमोर अडचणींचा डोंगर उभारलेला आहे. या अडचणीमुळे शेतकरी जेरीस आले आहेत. तर दुसरीकडे नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची प्रोत्साहनपर ५० हजार रुपये अनुदानावर बोळवण केल्यानं नियमित कर्जदारांमध्ये संतापाची भावना आहे. त्यामुळे राज्य सरकारनं नियमित कर्जदारांना २ लाख रुपयांचे अनुदान द्यावे, अशी मागणी शेतकरी नेत्यांनी केली आहे. मग नियमित कर्जदारांची मागणी काय आहे? नियमित कर्ज परतफेड करणं ही आमची चूक आहे का, असा सवाल नियमित कर्जदार का करत आहेत? राज्य सरकारने नियमित कर्जदारांची व्यथा का समजून घेतली पाहिजे? याचीच माहिती आजच्या द ॲग्रोवन शोमधून घेणार आहोत...
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com